पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देण्यात यावी.
सोलापूर - पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे प्रणित धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष इंजि. डी. आर .शेंडगे. यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
अहमदनगर येथील शूर सरदार रामोजी शेंडगे वाड्यात जिल्ह्यातील धनगर समाजाची बैठक संपन्न झाली. मतदार संघातील धनगर समाज आजपर्यंत प्रा राम शिंदे यांच्या पाठीमागे उभा राहील. या पोट निवडणूकीत भाजपने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी . भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा जामखेड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे व राज्याचे माजी जल संधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी. प्रा. राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. धनगर समाजाचे मेळावे घेऊन धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले.
प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण झाले. अहिल्यादेवी अध्यासन केंद्रास मंजूरी मिळाली. त्याच बरोबर सर्व समाजात त्यांचे कार्य आहे. तरी सोलापूर जिल्ह्यात प्रचारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते तन मन धनाने अहोरात्र परिश्रम घेतील असा विश्वास यावेळी उपस्थित अनेकांनी व्यक्त करत प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी दिली अशी मागणी केली आहे.
Post a Comment