देशाभिमान कृतीतून दिसला पाहिजे -बाळासाहेब बोराटे

 श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा

देशाभिमान कृतीतून दिसला पाहिजे -बाळासाहेब बोराटे

नगर -  देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी असून, देश माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा मी देशासाठी काय करणार याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. आजचा युवक उद्याचे भविष्य घडविणारे नागरिक आहेत.  शिक्षणाबरोबरच भारत महासत्ता करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यासाठी संस्कारक्षम पिढी निर्माण होणे गरजेचे आहे. देशाचा अभिमान प्रत्येकाला असतो, तो क्रिकेट पुरता मर्यादित न ठेवता, आपल्या प्रत्येक कृतीतून दिसला पाहिजे. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केल्यास देश नक्कीच महासत्ता होईल, असे प्रतिपादन श्री सावताश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अंकुश पटवेकर, मुख्याध्यापिका सुनिता पालवे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे आदि उपस्थित होते


याप्रसंगी मुख्याध्यापिका सुनिता पालवे  म्हणाल्या, 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाद्वारे भारत हे एक सार्वभौमत्व राष्ट्र म्हणून उदयास आले. समता, बंधूत्व आणि एकता या त्रिसूत्रीतून देशाला एका धाग्यात बांधण्याचे काम झाले आहे. प्रत्येकाला अधिकार मिळाले परंतु त्याचबरोबर कर्तव्याचीही जाणिव करुन देण्यात आली आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडून देशाला बलशाली करु शकतो, असे सांगितले.


     यावेळी मुख्याध्यापक राजकुमार शिंदे यांनी संवाधान वाचन केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


  फोटो - श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अंकुश पटवेकर, मुख्याध्यापिका सुनिता पालवे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे आदि. (छाया : राजु खरपुडे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post