श्री सावताश्रम शिक्षण समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
समाजातील वंचितांना शिक्षण देण्याचा कार्य संस्थेच्यावतीने सुरु
- बाळासाहेब बोराटे
नगर - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींना शिक्षण बंदी होती, अशा परिस्थितीत स्वत: शिक्षण घेऊन मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे मुली शिक्षित होऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने आपले नाव चमकवित आहेत. श्री सावता श्रम शिक्षण समितीच्यावतीनेही मुलींच्या शिक्षणासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. मुलींना शिक्षण मिळावे, त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहव्यात, यासाठी संस्थेच्यावतीने मुलींसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महात्मा ज्योतिबा फुले व सवित्रीबाई फुले यांनी वंचितांना शिक्षण देण्याचा जो वसा उचचला आहे, तेच कार्य संस्थेच्यावतीने सुरु असल्याचे प्रतिपादन श्री सावताश्रम शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री सावता श्रम शिक्षण समितीच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व महात्मा फुले विद्या मंदिर यांच्यावतीने सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिव प्रा.सुनिल जाधव, कार्याध्यक्ष विष्णू फुलसौंदर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, जालिंदर बोरुडे, शेखर व्यवहारे, मुख्याध्यापिका सुनिता पालवे आदि उपस्थित होते.याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून स्त्री शिक्षणाची जी चळवळ उभे राहिली आहे, ती पुढे नेण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. संस्थेच्यावतीने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्तविकात मुख्याध्यापिका सुनिता पालवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन शेखर व्यवहारे यांनी केले तर आभार विष्णू फुलसौंदर यांनी मानले.
कृपया प्रसिद्धीसाठी आपला
फोटो - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री सावताश्रम शिक्षण समितीच्यावतीने सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिव प्रा.सुनिल जाधव, कार्याध्यक्ष विष्णू फुलसौंदर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, जालिंदर बोरुडे, शेखर व्यवहारे, मुख्याध्यापिका सुनिता पालवे आदि. (छाया : राजु खरपुडे
Post a Comment