साई संघर्ष व साई इच्छा बचतगटातील महिलांचा सन्मान

 साई संघर्ष व साई इच्छा बचतगटातील महिलांचा सन्मान


बचत गटामुळे महिलांना स्वयंरोजगारा बरोबरच उद्योजक होण्याची संधी - कमल गायकवाड


     नगर - देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. स्त्रीयांनी समाजात काम करतांना स्त्रीत्व जपून आत्मशक्ती वाढविली पाहिजे. स्त्री शक्तीला प्राधान्य देण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून राज्य शासन भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे. महिलांना स्वयंरोजगारा बरोबरच बचत गटांमुळे उद्योजक होण्याची संधी मिळत आहे. बचत गटांमुळे कर्ज सुविधा सहज उपलब्ध होत असून, यामुळे स्वयंरोजगाराची संधी मिळते. नवीन उद्योग व्यवसायाला चालना मिळते, यामुळे उद्योजक होण्यासाठी महिलांनी पुढे यावे,  असे प्रतिपादन साई संषर्घ बचत गटाच्या सचिव कमल गायकवाड यांनी केले.


     सावेडी उपनगरात साई-संघर्ष व साई इच्छा बचत गटातील महिलांचे चांगले काम होत असल्याने सावित्रींच्या लेकी म्हणून या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला फकीरवाडा जिल्हा बँकेच्या शाखाधिकारी चारुशिला लांडे, जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी किरण कुंभारकर उपस्थित होते.


     अध्यक्ष पुष्पा राऊत यांनी प्रास्तविकात साई संघर्ष बचत गटाने केलेल्या कामाचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे चारुलिा लांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिलांमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यांच्या व्यवसायिक कामांना व गुणांना संधी दिली तर त्या आर्थिकदृष्टया सक्षम होतील, त्यासाठी बँकांनी बचत गटांना वेळेत कर्ज पुरवठा करुन सहकार्य करण्याची भुमिका घ्यावी, असे सांगितले.


     जनता बँकेचे कुंभारकर म्हणाले की, महिला आता सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. बचत गटांच्या माध्यमातून त्या आत्मनिर्भर होतात. जनता बँकेमार्फत सर्व बचत गटांना परवडेल असे कमीत कमी दरात जास्त कर्ज सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. विविध आकर्षक कर्ज योजना बाबत त्यांनी सविस्तर माहिती यावेळी उपस्थित महिलांना दिली.


     बँकेने  काढलेल्या 2021  दिनदर्शिकेचे वाटप यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके व साई संषर्घ सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात महिलांच्या बचत गटांचे चांगले काम सुरु असल्याने, त्यांचा सन्मान होणे उचित असल्याचे श्री. पिंपळे यांनी सांगितले.  यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी बचत गटातील महिलांना सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी महिला बचत गटांच्या प्रमुख पुजा येल्ला यांनी सर्व महिलांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन सन्मान केला.


     या सन्मान सोहळ्यास ऐश्‍वर्या भावे, वंदना दडगे, विद्या एकलदेवी, जिजा पालवे, अश्‍विनी पुंड, स्वाती आव्हाड, संगीता ठोकळ, सुनिता ठोकळ, संगीता मेहेत्रे, मंगल आव्हाड, कल्पना खोमणे, कमल कापडे आदिंचा सन्मानचिन्ह प्रशास्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन अश्‍विनी पुंड यांनी केले तर आभार प्रिती धाडगे यांनी मानले.


-------


     कृपया प्रसिद्धीसाठी               आपला


 


     फोटो - साई-संघर्ष व साई इच्छा बचत गटातील महिलांचा ‘सावित्रींच्या लेकी’ म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी कमल गायकवाड, पुजा येल्ला, चारुशिला लांडे, किरण कुंभारकर, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, योगेश पिंपळे, प्रिती धाडगे आदि. (छाया : विजय मते)


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post