बारा बलुतेदार महासंघाने रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत


 बारा बलुतेदार महासंघाने रक्तदान करुन केले नववर्षाचे स्वागत


कोरोना काळात रक्तदाते घटल्याने आता रक्तदान शिबीरांची खरी गरज - आ.संग्राम जगताप


     नगर - 2020 वर्ष हे फक्त कोरोनाची ओळख करुन देणारे ठरले. सण, उत्सवा बरोबरच विविध चांगल्या उपक्रमांवर निर्बंध आले होते. कोरोना काळात रक्तदान घटल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने आता येथून पुढे रक्तदान शिबीरांची खरी गरज आहे. आता कोरोनाचे संकटही दूर होत चालले आहे, तेव्हा रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व जपावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


     पाईपलाईन रोड येथे बारा बलुतेदारा महासंघाने नववर्षाचे स्वागत रक्तदान करुन केले. याप्रसंगी आ.जगताप मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार व  पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     आ.जगताप पुढे म्हणाले, राज्य सरकारने रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदानाचे आवाहन केले. या आवाहनाला स्वयंसेवी संघटना, विविध प्रतिष्ठान, महासंघ मोठ्या प्रमाणात शिबीरे घेऊन रक्तदान करीत असून, 2021 मध्ये जास्तीत जास्त रक्त संकलन करावे, असे आवाहन करुन बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी नवीन वर्षाचे स्वागत व आपला वाढदिवस रक्तदान शिबीराने करुन चांगला उपक्रम राबविला असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.


      यावेळी भगवान फुलसौंदर यांनी महासंघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. पदाधिकार्‍यांनी स्वत: रक्तदान करुन युवकांना प्रोत्साहित केल्याने रक्तदाते वाढतील, असा विश्‍वास व्यक्त केला.


     प्रास्तविकात माऊली गायकवाड म्हणाले, सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे, हे ओळखून नववर्षाचे स्वागत बारा बलुतेदार महासंघाने संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.रक्तदानामुळे निरपेक्ष भावनेने केलेले एक सात्विक दान होईल. रक्तदान चळवळीत व रुग्णसेवेत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.


     या रक्तदान शिबीरासाठी रामदास आहेर, बापू औटी, बाबुराव दळवी, बाबुराव ताकपेरे, अनिल इवळे, शहाजी कदम, अनिल निकम, रघुनाथ औटी, जर्नाधन शेलार, ज्ञानदेव निकम, श्रीपाद वाघमारे, निलेश पवळे, शाम औटी, संदिप वाघमारे, सुनिल पंडित, अशोक औटी, बापू इंगळे, विशाल सैंदाणे, संतोष जाधव, योगेश पिंपळे, संपत पंडित, सुधाकर पवार, तुकाराम गव्हाणे, संदिप घुले, मल्हारी गीते, किशोर नांदुरकर, नेते बाळासाहेब भुजबळ, राजेश सटाणकर तसेच स्वाती पवळे, वनिता बिडवे, छाया नवले आदिंसह महिला उपस्थित होत्या


     या शिबीरासाठी अष्टविनायक ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी बापू गायकवाड, अदिनाथ गायकवाड, दिलीप गायकवाड, गणेश गायकवाड, दिनेश गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले.


---------


     कृपया प्रसिद्धीसाठी               विजय मते


 


     फोटो - नवर्षाचे स्वागत बाराबलुतेदार महासंघाने रक्तदान करुन केले. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, अनिल निकम, बापू औटी, श्याम औटी, अशोक औटी, छाया नवले, स्वाती पवळे, वनिता बिडवे, बापू गायकवाड, योगेश पिंपळे आदि. (छाया : विजय मते)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post