काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन


 काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

नगर - सत्य, अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधीजी आणि गांधीजींची काँग्रेस आज नगर शहरात विशिष्ट व्यक्तीच्या नावाने ओळखली जाऊन कोणाच्या तरी द्वेष करण्याच्या प्रयत्नात पक्षातील निष्ठावंतांना दूर लोटून पक्षाचे ध्येय, धोरणं, विचार, परंपरा मोडीत काढली जात आहे. अशा पक्षातील नवोदितांसहीत त्यांना साथ देणार्या पक्षातील अशांना सुबुद्धी देवो! अशी प्रार्थना आज महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून  काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांच्यासह पदाधिकार्यांनी केली.

वाडिया पार्क येथील गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष अॅड. आर.आर.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमास अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, प्रदेश सदस्य शाम वाघस्कर, उपाध्यक्ष शशिकांत पवार, आर.आर.पाटील, एम.आय.शेख, राजेश बाठिया, सरचिटणीस अभिजित कांबळे,  संतोष धिवर, विवेक येवले, अनिल परदेशी, अनिल वराडे, भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष मार्गरेट जाधव, प्रदेश सदस्य शारदाताई वाघमारे, सुमन काळापहाड, संध्या मेढे, ग्रा.पं.सदस्य किरण अळकुटे, मीना घाडगे, रजनीताई ताठे, राणीताई गायकवाड, संतोष फुलारी, संजय झोडगे, अॅड.भिंगारदिवे, निजाम पठाण, विवेक येवले, विजय आहेर, अनिल निकम आदि उपस्थित होते. 

------

कृपया प्रसिद्धीसाठी बाळासाहेब भुजबळ


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post