बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च व होप फॉर चिल्ड्रेन या संस्थेच्यावतीने
भिंगार मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत
नगर - भिंगार येथील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च व होप फॉर चिल्ड्रेन या संस्थेच्या संयुक्त विद्यमान गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. महिला पोलिस कर्मचारी पूनम पंडित व सुनिता आव्हाड यांच्या हस्ते या मुलांना वह्या देण्यात आल्या. यावेळी रेव्ह.फादर मनिष गायकवाड, होप फॉर चिल्ड्रेन संस्थेचे महेश रावत, जयेश परमार, अरूण साळवे, फादार बेनिइप्पन आदी उपस्थित होते.
रेव्हरंड मनिष गायकवाड म्हणाले की, बिशप डॉ.के.पी.योहान्नन यांच्या मार्गदर्शनाखाली बिलिव्हर्स चर्च गोर-गरीब गरजूंना नेहमीच मदतीचा हात देत असते. शालेय शिक्षण हे मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये, गरजू मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना शालेय साहित्याची मदत देण्याचा हा उपक्रम राबविला, असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश रावत म्हणाले की, होप फॉर चिल्ड्रेन संस्थेने लॉकडाऊन काळात संपूर्ण देशभरात 60 हजारांहून अधिक गरजू मुलांना आधार देण्याचे काम केले. महाराष्ट्रातही 25 हजार मुलांना या काळात किराणा किट तसेच शालेय साहित्य देवून त्यांना उमेद देण्याचे काम केले आहे. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून संस्था कार्यरत आहे.
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शालेय साहित्यामुळे त्यांच्या चेहर्यांवर समाधान झळकले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करुन, अशा उपक्रम नियमित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
------
कृपया प्रसिद्धीसाठी यतीन कांबळे
फोटो - भिंगार येथील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च व होप फॉर चिल्ड्रेन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना पोलिस कर्मचारी पूनम पंडित व सुनिता आव्हाड यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रेव्ह.फादर मनिष गायकवाड, होप फॉर चिल्ड्रेन संस्थेचे महेश रावत, जयेश परमार, अरूण साळवे, फादार बेनिइप्पन आदी. (छाया : यतीन कांबळे)
Post a Comment