मुलीबरोबरच झाडाचेही केले कन्यादान

 मुलीबरोबरच झाडाचेही केले कन्यादान



     नगर - वृक्षारोपणाचे महत्व आज अनेकजण सांगतात, मिडिया व प्रसार माध्यमामध्येही याबाबत बातम्या येत असतात, कार्यक्रमाप्रसंगीही वृक्षांचे वाटप करुन वृक्षरोपणाच्या चळवळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या कार्यक्रमांपुरतेच अनेकजण या गोष्टी लक्षात ठेवतात आणि त्यानंतर विसरुन जाऊन आपल्या नित्यकर्माला लागतात. परंतु एका पित्याने आपल्या मुलीच्या 13 व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करुन त्याचे मुलीप्रमाणे संगोपन केले. जस जसे झाड वाढत होते. तस-तसे या झाडाबद्दल अधिकच प्रेम वाढत गेले. झाड मोठे होत गेले अन् मुलगीही. मुलगी उपवर झाल्यानंतर तिचे लग्न ठरले. बहरत चालेल्या झाडाप्रमाणे आपल्या मुलीचाही संसार बहारावा या उद्देशाने वधू पित्याने लग्नाच्या दिवशी मुली बरोबर झाडाचेही कन्यादान केले.


     अंबादास चाटल यांनी आपली मुलगी स्नेहल हीच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या वृक्षाचे तिच्या लग्नात कन्यादान बरोबर वृक्षदान करुन एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. चि.सौ.कां.स्नेहल चाटला व चि. प्रतिक कोडम यांच्या विवाहप्रसंगी हे दोन्ही कन्यादान पार पाडले. यावेळी वधू-वरांनीही आपल्या लग्नाचा प्रत्येक वाढदिवस या वृक्षाबरोबर साजरा करु, असे सांगितले. यावेळी उपस्थितांनी कौतुक करुन वेगळ्या उपक्रमाची चर्चा केली.


     अंबादास चाटला यांनी वाढविलेल्या झाडाचे मुलीच्या कन्यादानाबरोबरच वृक्षाचेही कन्यादान करण्याचा प्रस्ताव श्री मार्कंडेय देवस्थानच्या पदाधिकार्‍यांसमोर मांडला. दातरंगे मळा येथील मार्कंडेय संकुल येथे पार पाडलेल्या विवाह प्रसंगी संकुल परिसरात या वृक्षाचे वधू-वरांच्या हस्ते या वृक्षाचे रोपण करण्यात आले. त्याची जबाबदार देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी घेतली. याप्रसंगी ज्ञानेश्‍वर मंगलारम् यांनी प्रत्येक वधू पित्याने अंबादास चाटला यांच्याप्रमाणे कन्यादानाबरोबर वृक्षदानही केले तर वृक्षरोपणाची चळवळ मोठ्या प्रमाणात रुजेल, असे सांगितले.


     याप्रसंगी वधूपिता अंबादास चाटला, सौ.मोनिका चाटला, वर पिता भिमराज कोडम, सौ.सुरेखा कोडम,  रघुनाथ गाजेंगी, दत्तातय वंगा, विठ्ठल वंगा, देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारम्, श्रीनिवास वंगारी, निर्मला सग्गम, उमा चाटला, लक्ष्मी दसकंद, प्रतिमा व प्रतिक्षा कोडम, प्रथमेश चाटला,  आदिंसह वर्‍हाडी मंडळी उपस्थित होते.


-----


     कृपया प्रसिद्धीसाठी                                                 ज्ञानेश्‍वर मंगलारम् (मो.9890100879)


 


     फोटो - अंबादास चाटल यांनी आपली मुलगी चि.सौ.कां.स्नेहल चाटला व चि. प्रतिक कोडम यांच्या विवाहप्रसंगी   कन्यादान बरोबरच वृक्षदान केले. याप्रसंगी सौ.मोनिका चाटला,  भिमराज कोडम, सौ.सुरेखा कोडम,  रघुनाथ गाजेंगी, दत्तातय वंगा, ज्ञानेश्‍वर मंगलारम्, श्रीनिवास वंगारी, प्रतिमा व प्रतिक्षा कोडम, प्रथमेश चाटला आदि.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post