शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन - सचिन भुतारे

 फि बाबत तगादा करणार्या शाळांवर कारवाई करावी मनसेची शिक्षणाधिकांर्याकडे मागणी


शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन - सचिन भुतारे

नगर -  नगरमधील शाळांकडून पालकांकडे तगादा लावून फि वसूल करणार्या शाळांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिक्षणाधिकारी  यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अॅड.अनिता दिघे, परेश पुरोहित, इंजि.विनोद काकडे, धिरज पडोळे, राजू कांबळे, सचिन गुप्ता, संजय आंधळे, किरण सोनी, मकरंद चिंतामणी, रवी दंडी, जय ठाकूर, सचिन शेरकर आदि उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरमधील अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने पालकांना शालेय फी भरणेबाबत सारखी मागणी केली जाते. इ.10 वी चा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा फी भरल्याशिवाय केली जाणार नाही, असे सांगितले जाते. 

सध्या कोविडच्या महासंकटामुळे लॉकडाऊनच्या कारणाने सर्व व्यवसाय बंद झाले. सर्व पालक आर्थिक अडचणीला तोंड देत आहे. त्या दृष्टीकोनातून शासनाने देखील फीची सक्ती करु नये, असे आदेश दिले आहेत, परंतु वरील शाळांकडून त्याबाबत विचार न करता पालकांकडे सारखी मागणी करुन त्यांना अडचण निर्माण केली जात आहे. 

या संदर्भात मा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकेवर फी मध्ये सवलत देण्याचे व फि कमी करण्याचे आदेश दिले आहे. तरी आपण याबाबत वरील संस्थेची फी कमी करुन फी भरण्यास सवलत देण्यासंबंधी तसेच फी करता इ.10वीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवू नये असे आदेश द्यावेत, त्यामुळे पालकांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. 

याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, कोरोनामुळे सध्या शाळेचे कामकाज ऑनलाईनच सुरु आहे, परंतु तरीही नगरमधील काही शाळा पालकांना वेगवेगळ्या अनावश्यक फि साठी तगादा लावत आहेत. शासनाने व न्यायालयानेही फी बाबत सक्ती करु नये व सवलत देण्यात यावीत, असे आदेश दिलेले असतांनाही शाळांकडून पालकांवर फि साठी दबाव टाकला जात आहे. याबाबत शिक्षणाधिकार्यांना निवेदन दिले आहे. यात संबंधित शाळांनी सुधारणा न केल्या मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असेही भुतारे यांनी यावेळी सांगितले. 

शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांकडून फी सुरु असलेल्या प्रक्रियेची माहिती घेऊन शासनाच्या नियमानुसार कार्यवाही होत आहे की, नाही, याबाबत खात्री करु. काही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळांवर कारवाई करु, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही. तसेच पालकांवर अतिरिक्त फि साठी दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

------

कृपया प्रसिद्धीसाठी आपला


फोटो - नगरमधील शाळांकडून पालकांकडे तगादा लावून फि वसूल करणार्या शाळांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिक्षणाधिकारी  यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अॅड.अनिता दिघे, परेश पुरोहित, इंजि.विनोद काकडे, धिरज पडोळे, राजू कांबळे आदि. (छाया : राजु खरपुडे)


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post