निशांत दिवाळी अंकाने 20 वर्षात अनेक साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले - माजी मंत्री अण्णा डांगे

 


निशांत दिवाळी अंकाने 20 वर्षात अनेक साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले

- माजी मंत्री अण्णा डांगे


     नगर  -  गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देत निशांत दिवाळी अंकाने या साहित्यिकांबरोबर आपलीही उंची वाढवली. राज्यात कोरोनाची परिस्थिती असतांनाही साहित्यिकांच्या लेखांबरोबरच मान्यवरांच्या परिसंवादाची सांगड घालत वाचनिय दिवाळी अंकाची परंपरा कायम राखत आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले असल्याचे गौरोद्गार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले.


     माजी मंत्री अण्णासाहेब डांगे नगरमध्ये आले असता निशांत दिवाळी अंक भेट देऊन संपादक निशांत दातीर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मल्हार सेनेचे गोरक्ष गावडे, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक राजेंद्र तागड आदि उपस्थित होते.


     पुढे बोलतांना अण्णासाहेब डांगे म्हणाले की, राजकारणात पदार्पण केल्यानंतरही मी पत्रकारिता व लिखाणात नेहमीच रमलो. राजकीय व्यासपीठापेक्षा साहित्यिकांच्या बैठकीकडे माझा नेहमीच कल राहिला आहे. नगरमध्ये आल्यानंतर नगरच्या पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मी नेहमीच निशांतशी संपर्क साधतो. त्याचा पत्रकारितेतील मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. दिवाळी अंक साहित्य निर्मितीचा अविभाज्य घटक असून, राज्यभरातील साहित्यिक, कवी यांच्या साहित्यांना स्थान देत वेगवेगळे विषय हाताळल्यामुळे 20 वर्षातील निशांत दिवाळी अंक नेहमीच चर्चेत राहिला आहे. या अंकाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील, अशा शुभेच्छा!


--------


     कृपया प्रसिद्धीसाठी


 


     फोटो -  माजी मंत्री अण्णासाहेब डांगे नगरमध्ये आले असता निशांत दिवाळी अंक भेट देऊन संपादक निशांत दातीर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मल्हार सेनेचे गोरक्ष गावडे, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक राजेंद्र तागड आदि


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post