नारायणी एजन्सीमार्फत मदर डेअरी उत्पादनांच्या वितरणास सुरुवात


 नारायणी एजन्सीमार्फत मदर डेअरी उत्पादनांच्या वितरणास सुरुवात 

अहमदनगर (प्रतिनिधी) :दूग्ध  क्रांती आणि   सहकार  चळवळीचे जनक असलेल्या डॉ . कुरियन कुरियन  यांच्या  सुप्रसिद्ध मदर डेअरीची  फ्रॅन्चाइसी सावेडीतील नारायणी एजन्सीकडे आली आहे.  नगरमधील व्यावसायिक उदय जोशी आणि  सौ प्रणिता झोटिंग यांनी नारायणी एजेन्सी च्या माध्यमातून मदर डेअरीची फ्रॅन्चाइसी घेतली आहे.  मदर डेअरीच्या उत्पादनाचे नगर मध्ये वितरण आणि विक्रीचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यशाळेतील निवृत्त कर्मचारी श्रीमती उषा रमेश झोटिंग यांच्या हस्ते या विक्रीदालनाचे उदघाटन झाले . यावेळी कंपनी चे वरिष्ठ अधिकारी चेतन कार ,आशुतोष कुलकर्णी , बाळकृष्ण मोरे विनोद दहिवाळ तसेच  प्रमोद मोहोळे , श्री व सौ. सुरेश जोशी, प्रशांत मोहोळे आदी उपस्थित होते.   अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत कंपनीच्या उत्पादनांची माहिती दिली . 

               यावेळी बोलताना कंपनीचे  भारताचे पश्चिम  क्षेत्रीय विक्री अधिकारी चेतन कार म्हणाले की , सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या डॉ . कुरियन यांनी अमूल आणि मदर डेअरी सुरु करून सामान्य शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशा पद्धतीने शुद्ध दुधाचे संकलन सुरु केले .  दुधावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात यामुळे क्रांती झाली . मदर डेअरी ही आजही एक सहकारी संस्था असून सभासद शेतकऱ्यांना ८० टक्के फायदा करून दिला जातो . याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून एकट्या दिल्लीतच कंपनी दरोरोज ५० लाख लिटर दुधाची विक्री करते. . ५ विभागामार्फत कंपनीने  संपूर्ण उत्तर भारतात आपले जाळे पसरविले आहे. 

               कंपनीचे आईस्क्रीम विभागाचे महाराष्ट्र व गोव्याचे क्षेत्रीय विक्री अधिकारी बाळकृष्ण मोरे यांनी मदर डेअरी उत्पादित  करीत असलेल्या इतर उत्पादनांची माहिती दिली . कंपनी सफल नावाने उत्पादित करीत असलेल्या फ्रेश फ्रोजन वाटाणे , भाज्या , फळे , लोणची ज्यूस , आलू टिक्की , हरभरा कबाब विशेष लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील तयार माल कोणत्याही दलालाच्या हातातून न घेता थेट शेतकऱ्याकडून कंपनी खरेदी करीत असल्यामुळे उत्पादनाला योग्य हमीभाव तर कंपनी देतेच त्यासोबत ग्राहकांनाही अतिशय माफक दरात हा भाजीपाला कंपनीमार्फत मिळतो . नगरकरांनी मदर डेअरीची उत्पादने वापरून आपला फायदा करून घ्यावा . हा माल शेतकरी सेंद्रिय पद्धतीने पिकवत असल्याने आपले आरोग्य व्यवस्थित राहते . 

               महाराष्ट्र आणि गोवा विभागात शीतकरण प्रक्रिया उत्पादनांचे क्षेत्रीय अधिकारी आशुतोष कुलकर्णी म्हणाले की , कंपनी लोकप्रिय असे मिल्कबेस आईस्क्रीम बनवते. असे आईस्क्रीम भारतात फक्त २ किंवा ३ कंपन्या बनवतात. त्यासोबत फ्रेश दही , फ्रेश ताक , मसाला ताक , चीज , बटर , फिल्टर्ड मिल्क यांचे उत्पादन कंपनी करते.  जास्त दिवस टिकणाऱ्या  टेट्रा पॅकिंग मध्ये कंपनीची उत्पादने वितरित होतात. घट्ट व पौष्टीक दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या मदर डेअरीचे पदार्थ त्यामुळे विशेष लोकप्रिय आहेत. 

             कंपनी सुप्रसिद्ध असे धारा हे शेंगदाणा व सोयाबीन तेल बनवते . हे तेल व्यवस्थित रिफाइन केलेले असल्याने आरोग्यासाठी ते खूप लाभदायक आहे. त्यामुळे  नारायणी एजन्सीचे मदर डेअरीचे विक्री व वितरण दालन  , सावेडीतील रासने नगर येथील डौले हॉस्पिटल मागे मयुरेश्वर अपार्टमेंट येथे असून सावेडीकर व नगरकरांनी एक वेळ अवश्य ही उत्पादने खरेदी करावी असे आवाहन संचालिका सौ. प्रणिता झोटिंग यांनी केले आहे.   यावेळी उपस्थित सर्वांचे आभार संचालक उदय जोशी यांनी मानले . सूत्रसंचालन प्रशांत मोहोळे यांनी केले .  

 सौ . प्रणिता झोटिंग संचालिका , नारायणी एजन्सी  मोबाईल :9823138856

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post