धनगर
(निशांत दातीर,जिल्हाध्यक्ष धनगर समाज सेवा संघ, अहमदनगर संपर्क ९८५०२०३७४५)
पार्श्वभूमी
ही भटकी जमात महाराष्ट्रात
सर्वत्र विखुरलेली असून
त्यांची मातृभाषा मराठी
आहे.
त्यांचे दैवत जेजुरीचा खंडोबा
असून नेताळे येथील मातोबा
आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध
आहे.
या दोन्ही देवता पाळीव
प्राण्यांच्या रक्षणासाठी तसेच नवसाला पावणार्या आहेत.
व्यवसाय
या जमातीचा पिढीजात धंदा ‘मेंढपाळ’
हाच असून व्यवसायासाठी सात-आठ
महिने भटक्याचे जीवन
जगावे लागते. मेंढ्यांपासून लोकर
मिळविणे, लोकर विकणे, त्याच लोकरीपासून
धोंगड्या, कांबळे, जीन तयार
करणे या व्यवसायात हे
लोक आहेत. स्त्रिया देखील
त्याच व्यवसायात मदत
करताना आढळतात. मेंढपाळी व्यवसायात
वनविभागातून होत असलेल्या त्रासामुळे
व्यवसाय उद्धवस्त होत
चालला आहे. चराई कुरणांचा
प्रश्नही गंभीर आहे. राज्य
शासनाकडून चराई कुरण पास
देण्याबाबतही उदासिनता असते.
वास्तव्य
सातारा, सांगली, नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे या
जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर तर
धुळे, जळगांव, औरंगाबाद, नागपूर यासारख्या
जिल्ह्यातून कमी अधिक प्रमाणात
आढळतात. जवळजवळ दोन-तीन लाखांपर्यंत
यांची लोकसंख्या असल्याचा
प्राथमिक अंदाज आहे.
संस्कृती
हिंदू धर्मिय असून, मराठी मातृभाषा
आहे.
देवादिकांवर प्रगाढ विश्वास असून, अंधश्रद्धाळू
आहे.
पुरुष शर्ट, धोतर, फेटा असा
पेहराव करतात तर स्त्रिया
लुगडे, चोळी परिधान करतात.
यात्रा /
जत्रा
जेजुरी येथील ‘खंडोबा’ नाशिक जिल्ह्यातील
निफाड तालुक्यातील वेताळे
येथील ‘मातोबा’ची यात्रा हे यांचे
प्रमुख यात्रा ठिकाण. या देवतांचा
उपवास रविवारी करतात. यांना प्रसन्न
करण्यासाठी प्राण्यांचा बळी
दिला जातो.
घरे/निवास
पूर्वी भटकत राहण्याच्या वृत्तीमुळे
स्थलांतर करावे लागत असल्याने
हे ताडपत्री तंबूचा
वापर करीत. कालामानातील बदलामुळे
शेतीकडे वळलेले दिसतात. त्यामुळे स्थलांतरित
जीवनमान बदलून स्थानिक होण्याकडे
कल.
त्याचा परिणाम शेतीमुळे खेड्यांतून
आणि शहरांतून कमीअधिक
प्रमाणावर वास्तव्य होऊ
लागल्यामुळे बर्याच ठिकाणी
पक्की घरे बांधून राहू
लागल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून
येते.
शिक्षण
जीवनात थोडेफार स्थैर्य निर्माण
झालेले दिसताच मुला-मुलींच्या शिक्षणाकडे
जातीने लक्ष पुरवितात असे
दिसून येते. पूर्वी मात्र
शिक्षणाचे प्रमाण अतिशय अल्प
होते, परंतु जसजशी अस्थिरता
येऊ लागली तसतसे शिक्षणाच्या
प्रमाणात लक्षणीय वाढ होऊ
लागल्याचे दिसून येते.
लग्नविधी
लग्नविधी संपूर्णपणे हिंदू
धर्मीय असलेला दिसतो. अर्थात आजही
समाजात त्यांच्या रुढी
आणि पंरपरांना अनुसरुन
बालविवाह करण्याची पद्धती
आहेच.
अंत्यविधी
हिंदू
धर्मीय असल्याने मृतावर
दहन संस्कार केले जातात. काही
पोटजातीत मात्र दफन संस्कार
पद्धती रुढ असल्याचे दिसून
येते.
पोटशाखा
1)
अहिर 2) डांगे 3) गटरी 4) हंडे 5) तेलवर 6) हटकर 7) शेगर 8) खुटेकर 9) तेलंगी 10) तेलकरी
11) कोकणी धनगर 12) कानडे 13) वर्हाडे धनगर 14)
झाडे 15) झेंडे 16) कुरमार 17) माहुरे
18) लाडसे 19) सनगर
समाजावरील आघात -
केंद्र
शासनाच्या सवलतीच्या यादीमध्ये
महाराष्ट्रातील धनगर जातीचा ‘धनगड’ असा उल्लेख
झाल्यामुळे अनुसुचित जमातीच्या
सवलतींपासून समाज वंचित आहेत.सांगली
येथे पंतप्रधान राजीव
गांधी व मुख्यमंत्री शरद
पवार यांच्या उपस्थित देशव्यापी मेळावा
झाला. त्यावेळी माजी मंत्री
कै.शिवाजीबापू
शेंडगे यांनी प्रथम आवाज
उठविला तत्कालीन मुख्यमंत्री
शरद पवार यांनी ‘एनटी’ सवलती धनगर
समाजाला लागू केल्या. युती शासनाच्या
काळात पंतप्रधान अटलबिहारी
वाजपेयी यांनी पंढरपूर येथे
आयोजित करण्यात आलेल्या भटक्या-विमुक्तांच्या
मेळाव्यात धनगर समाजाला अनुसूचित
जमातीच्या सवलती देण्याचे जाहीर
आश्वासन
दिले. मात्र अद्यापर्यंत अनुसूचित
जमातीच्या सवलतींपासून हा
समाज वंचित आहे. 2009 साली
झालेल्या लोकसभा निवडणूकीत माढा
लोकसभा मतदार संघात शरद
पवार यांनी धनगर समाजाला
अनुसूचित जमातीच्या सवलती
देण्याचे आश्वासन दिले. मात्र
याबाबतही अद्यापपर्यंत राज्य
शासनाकडून अथवा केंद्र शासनाकडून
समाजाच्या पदरात पडले नाही.
समाजाला आरक्षणाच्या सवलती
मिळाव्या म्हणून राज्यभरातील आंदोलने
नगर जिल्ह्याने हिरेरीने
सहभाग नोंदविला. यामध्ये धरणे
आंदोलन आरक्षण संदेश यात्रा
मंत्रालयावर मोर्चा तसेच राष्ट्रपतींशी
दिल्ली येथे शिष्टमंडळाने घेतलेली
भेट आदिंचा समावेश आहे.
जिल्ह्यातील संस्था -
1)
अहिल्या सेवा संघ संचलित
प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,
अहिल्यानगरी, नगर 2) अहिल्यादेवी होळकर
प्राथमिक विद्यालय, सडे,राहुरी, 3) अहिल्याबाई
होळकर माध्य.विद्यालय, खांबे, संगमनेर. 4) अहिल्याबाई
होळकर आश्रम शाळा, शिपलापूर, संगमनेर व
श्रीगोंदा. 5) यशवंत नागरी सह.पतसंस्था,
श्रीरामपूर. 6) पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर ना.सह.पतसंस्था, भिस्तबाग,नगर.
जिल्ह्यातील मान्यवर
-
, माजी जिल्हा परिषद
अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जिल्हा
दूध संघाचे माजी चेअरमन
दादाभाऊ चितळकर, मर्चंट बँकेचे
माजी चेअरमन सुभाष भांड, जिल्हा
बँकेचे संचालक तथा संगमनेर
तालुका दूध संघाचे चेअरमन
बाजीराव पा.खेमनर, पारनेर पं.स.माजी
सभापती आशाताई गावडे, राहूरी बाजार
समितीचे उपसभापती गंगाधर
तमनर, नेवासा पं.स. उपसभापती तुकाराम
मिसाळ, पाथर्डीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण
हांडळ, वृद्धश्वर सारख
कारखान्याचे संचालक अनंतराव शिंदे, महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणचे अशोक
भिसे, माजी जि.प.सदस्य मुरलीधर
थोरात, शांतीलाल कोपनर, जि.प.सदस्य मधुकर
उचाळे, पं.स.माजी सभापती
बाबुराव कजबे, श्रीरामपूर पं.स.चे
माजी सभापती सुरेश कोकरे,गंगाधर
गोराने,संजीवनी साखर कारखान्याचे
माजी उपाध्यक्ष त्रिंबक
सरोदे, गणेश साखर कारखान्याचे
माजी उपाध्यक्ष सावित्राबाई
थोरात, मुळा साखर कारखान्याचे
संचालक नानासाहेब तांबे, मोहन
राशीनकर, आबासाहेब पांढरे, दगडू इखे, ज्ञानेश्वर
साखर कारखान्याचे संचालक
कारभारी जर्हाड, एकनाथ धानापुणे,
श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक
बापूसाहेब कोर्हटकर, कर्जतचे पं.स.माजी सभापती
अप्पासाहेब भिसे, पारनेर बाजार
समितीची संचालक भागाजी गावडे, जिल्हा
बँकेचे माजी संचालक रविंद्र
मासाळ, प्राथ.शिक्षक बँकेचे संचालक
दत्तात्रय गावडे, हमाल पंचायतचे
माजी संचालक नवनाथ महानुर, यशवंत
नागरी पतसंस्थेचे चेअरमन
मोठ्याभाऊ दातीर, शॅप्रो कंपनी, संगमनेरचे
चेअरमन बाळकृष्ण दातीर, ज्ञानेश्वर
सह.कारखान्याचे
चेअरमन निवृत्ती दातीर, धनगर
समाज उन्नत्ती महामंडळाचे
जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बाचकर, जैन
ओसवाल पतसंस्थेचे व्हा.चेअरमन
विनय भांड, नगर मनपाच्या
नगरसेविका सौ.शारदा दिगंबर
ढवण,
माजी नगरसेविका सौ.कमल
राहिंज, श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगरसेविका
अर्चना पानसरे, पाथर्डी नगरपालिकेचे
माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण
हंडाळ,
उद्योजक -
सिद्धी
फोर्जिग प्रा.लि.,एमआयडीसी, नगरचे सुधाकर
वाघमोडे, मंचिहिल
संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष शालीग्राम
होडगर, भांड बुक स्टॉल
व माऊली वितरणचे अमित
भांड, योगेश कंन्स्ट्रक्शन,नगरचे शशिकांत
राहिंज, कोणार्क कंन्स्ट्रक्शन राजेंद्र
पाचे, कर्जतचे उद्योगपती धनराज
कोपनर, उत्तम इलेक्ट्रीकल्स प्रा.लि. एमआयडीसी,
नगरचे उत्तम सरगर, आर्किटेक्ट माजी
अध्यक्ष चंद्रकांत तागड,
राज्यातील मान्यवर
-
माजी मंत्री कै.शिवाजीबापू शेंडगे, माजी दुग्ध विकास मंत्री अनंतराव देवकाते, माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे, आ.गणपतराव देशमुख, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे 9 वे वंशज तथा भाजपचे .प्रा.राम शिंदे आ.अनिल गोटे,आ गोपीचंद फडळकर, खासदार डॉ विकास महात्मेआ.रमेश शेंडगे, माजी आ.पोपटराव गावडे, आ.प्रकाश शेंडगे, माजी आ.झारगडमामा, आ.हरिभाऊ भदे, बापूसाहेब कोकरे,
सिने-नाट्य -
‘टिंग्या’
फेम शरद गोयेकर, अ.भा. नाट्य परिषदेचे
अध्यक्ष शशिकांत नजान,
विशेष उल्लेख -
नगर
जिल्ह्यातील ढवळपुरी येथील रहिवासी
काकासाहेब थोरात यांनी मुंबई
मधून आमदार म्हणून विजयी
झाले. नगर जिल्ह्यातील संगमनेर
तालुक्यातील एकनाथ पाटील जर्हाट
माजी मुख्यमंत्री विलासराव
देशमुख यांचे स्वीय सहाय्यक
होते.सध्या ते ठाण्याचे
जिल्हाधिकारी आहेत.
संघटना -
यशवंत
सेना - जिल्हाध्यक्ष कान्हू दाणे, राष्ट्रीय
समाज पक्ष - जिल्हाध्यक्ष भानुदास
हाके (मेजर), अ.भा. खुटेकर धनगर
समाज संघटना - राज्य कार्य.सदस्य
पी.आर.शिंदे, दक्षिण
जिल्हाध्यक्ष भास्कर
फणसे, उत्तर
जिल्हाध्यक्ष दशरथ लांडगे, धनगर समाज सेवा
संघ
- जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, धनगर महासंघ -
प्रदेश कार्य.सदस्य बाबासाहेब
तागड, विठ्ठल दातीर, शहर जिल्हाध्यक्ष
किसन कातोरे,
Post a Comment