सातारा, (प्रतिनिधी) : खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. आता तसाच पुढाकार धनगर आरक्षणसाठीही घ्यावा, अशी विनंती माजी मंत्री व भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदेंनी उदयनराजेंना शनिवारी (ता.3) भेटून केली. दरम्यान उभयंत्यांत दुपारी चार वाजता हाेणारी भेट रात्री उशिरा झाली. याबाबत खासदार उदयनराजेंनी ट्विटरवरुन तसेच माजी मंत्री शिंदे यांनी फेसबुक पाेस्टच्या माध्यमातून माहिती दिली.
त्यापुर्वी शिंदे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली हाेती. त्यावेळी ते म्हणाले, विरोधात असलं की प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण, सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो.
काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला. त्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झाले आहे. दरम्यान धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राम शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात रात्री उशिरा पु्ण्यात चर्चा झाली.
या चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकला नाही परंतु उदयनराजेंनी धनगर आरक्षण प्रश्नी खासदार माजीमंत्री राम शिंदे यांनी आज भेट घेवून आमच्याशी सविस्तर चर्चा केली. आपण आमच्या आरक्षण लढ्यात साथ द्यावी अशी विनंतीही त्यांनी केल्याचे टविटमध्ये नमूद केले आहे.

Post a Comment