कोळपेवाडीत वृद्धाचा खून; दोघांना अटक


कोपरगाव :  कोळपेवाडी येथे २८ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास पुंजा भागाजी नरोटे (६०, खडांगळी, तालुका सिन्नर) यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. त्यांचा लोणी येथील प्रवरा रुग्णालयात ३० ऑगस्टला सायंकाळी मृत्यू झाला. 

कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मृताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, २९ ऑगस्टला सकाळी ७ च्या दरम्यान वडील कोळपेवाडीत शाळेसमोर पडले होते. 

त्यांचा चेहरा व डाव्या बाजूचा डोळा सुजलेला व ओठाजवळ रक्ताचा डाग दिसत होता. त्यांनी सांगितले, मला दत्तात्रय किसन कोळपे व श्रावण कोंडाजी हलवर यांनी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी कोळपे व हलवर यांना अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post