नगर, (प्रतिनिधी) : माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी घेतली कै. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटूंबाची भेट, भेट घेऊन कुटूंबाचे सांत्वन केले. यानंतर बोलताना प्रा.शिंदे म्हणाले की, पांडुरंग रायकर हा प्रशासन आणि असुविधेचा बळी ठरलेला वरिष्ठ पत्रकार असल्याची खंत त्यांनी व्क्त केली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले.
पाडुरंग हे कामसू उमदा मनमिळाऊ स्वभावाचा होता. एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून द्यायची भूमिका त्याची होती. परंतु तोच अन्यायाचा बळी ठरला त्याला त्या सुविधा मिळाल्या नाही. सोमवारी(दि 7) राज्याचे पावसाळी अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पांडूरंग रायकर त्याच्या पत्नीला नोकरी मिळाली पाहिजे, तर सरकारने पत्रकारांना 50 लाखाची मद्यत जाहीर केली ती मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले.
तसेच ज्यांनी अडचण निर्माण केली, ज्यांच्या मुळे सुविधा मिळाल्या नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील प्रा.राम शिंदे यांनी यावेळी केली.

Post a Comment