तारकेश्‍वर गडाचे ह.भ.प.अदिनाथ महाराज शास्त्री यांची पुण्यश्लोक गणेश मंडळाला सदिच्छा भेट


नगर,दि.01 (प्रतिनिधी) : येथील कजबे वस्ती येथील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाला तारकेश्वर गडाचे मठाधिपती ह.भ.प आदिनाथ महाराज शस्त्री यांनी आज भेट देऊन मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष निशांत दातीर, प्रा चंद्रकांत वाव्हळ, गणेश भोर, रेणूकादास ठोंबरे, संदीप क्षीरसागर  आदी मान्यवरानी  सत्कार केला.    

पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी  विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी करोना रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे हे लक्षात घेऊन सार्वजनिक कार्यक्रम तसेच महाप्रसाद व स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र   यावर्षी    अरसिक अल्बम ३०,ब्रावो आणि मालेगाव काढा या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या गोळ्यांचे वाटप करत प्रबोधन करण्यात आले.  तसेच मंडळाचे जगदीप सानप यांनी श्रींची आरतीचे यजमानपद भूषवताना उपस्थित सर्व भाविकांना मास्कचे मोफत वाटप केले या सर्व उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, इंजि डी आर शेंडगे, कुणाल जायकर,  प्रा हनुमंत कुटे,तुषार माने , गौरव वानखेडे, आदिनाथ बर्डे,अमोल काळे, जगदीप  सानप,सुचीत शिंदे अंकुश गावडे , दत्तात्रय सुरम,अविनाश कुलट, युवराज कजबे,आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post