कोरोना काळात अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी ने आजीच्या नावे उभारली बाग

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेनी भेट देऊन केले वृक्षारोपन ;

 अभिनेत्री नित्यश्री आहे मालुंजे गावची कन्या


नगर,दि.30 (प्रतिनिधी) : अनेक मराठी चित्रपटासह आघाडीच्या वाहिन्यावर प्रसिध्द होणार्‍या मालिकानमध्ये मुख्य भुमिका करणार्‍या नित्यश्री ज्ञानलक्ष्मी उर्फ प्रियंका नागरे या मुळ संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावच्या रहिवासी आहेत. जगावर कोरोनाचे संकट आल्यानतंर मागील चार महिन्यापासून त्या आपल्या मालुंजे या गावी राहत असल्याने या वेळेचा सद उपयोग व्हावा यासाठी त्यानी याकाळात आपल्या कुटुंबीयासमवेत आजीच्या नावे अतिशय सुदंर बाग उभी केली असून या बागेला नुकतीच प्रसिद्ध व जेष्ठ अभिनेते सयाजी शिदें यानी भेट देऊन या बागेत वृक्षारोपन केले आहे.

मागील चार महिन्यापासून अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या आपल्या मालुंजे गावी असल्याने त्यानी नुकताच आपला वाढदिवस आजीच्या नावाने नवीन बाग उभारुण साजरा केला. यावेळी या बागेत त्यानी विविध रंगाची, सुगंधाची, फुलझाडे व फळझाडे तसेच अनेक शो ची देखील झाडे लावली आहेत. याचं बागेत अतिशय देखणे असे तुळशी वृदांवन देखिल उभे केले आहे. यासाठी नित्यश्री ज्ञानलक्ष्मीला लहान बंधू प्रितम, निसर्ग, निखिल व पूनमसह चिमुकल्या बहिनीनी मदत केली आहे.  नुकताचं साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या दिनी आई वडीलाच्या हस्तें या बागेच उध्दघाटन केले आहे.

तर दरम्यान नुकतीच जेष्ठ अभिनेते व ‘ सह्याद्री देवराई ’ चे प्रणेते सयाजी शिदें यानी यानी मालुंजे येथे येऊन या ‘ आजीच्या बागेला ’ भेट दिली व आपल्या बरोबर आणलेल्या बेल, रुद्राक्ष, जांभूळ, फणस, आवळा, पारिजात आदि रोपाचे वृक्षारोपन देखील केले. यावेळी सयाजी शिदें यानी नागरे कुटुंबासमवेत चुलीवरील जेवणाचा अस्वाद घेतला. यावेळी त्यानी शो ची झाडे लावण्याऐवजी देशी फुलाची, फळाची व इतर झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post